प्रीत - कविता

    प्रीत - कविता

प्रित कस्तुरी
 फुलपाखरा परि 
 न हाती फुलांच्या
 ही मृगजळी .


 चंचल ज्वानी
 भासते एक परी
 परिस पैंजण भारी
 कुबेराची राणी . 


मी एक मृग
 शोधात फिरतो कस्तुरी
 पाहताच लई लाजरी
 ती मज जीवाभारी 


तुझ्या वाटेवरती 
 प्राण विसरूनी 
नसा नसात फुटते
 तुझी चाहुली .


 न हाती कुणाच्या
 न हातामधी 
काढली नजरेची तू सावली
 संग तुझ्याच जाती ही पापणी 


डोळ्याची काजळी
 तू कशी काढली .


 रात्र जळते पाहुनी पुनवेची
 ती अशी कशी
 मजहूनी भारी 
मी सर्व परी होऊन ही सुंदरी


 ती 
शुभ्र
शीत
 चंचल
 मखमली
 संग कस्तुरी  . 

                     - राजेश मेकेवाड        







Comments

  1. कविता छान तयार केली आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा