मी तुमच्या सारखाच वाटलो

 मी तुमच्या सारखाच वाटलो 


देवाला देव वाटलो 
 सज्जनाला सजन वाटलो 
 भिकाऱ्याला भिकारी तर
 राजाला राजाच वाटलो 


 परक्याला परका 
असुरांना असुर  
 क्रूर तेला क्रूर तर
माणसाला माणूस वाटलो मी


 दगडांना दगड 
 मित्रांना मित्र
 शत्रूला शत्रू 
आपल्याला आपुलकीचा वाटलो 


 आंधळ्याला आंधळा 
 मुख्याला मुका 
बहिऱ्याला बहिरा 
 सजीवांना सजीव वाटलो 


मुंग्यांना मुंगी 
 हाती ला हाती 
 कोल्ह्यांना कोल्हा तर
वाघाला वाघ वाटलो 


मुलांना मुलगा 
 पित्याला पिता 
विद्यार्थ्याला विद्यार्थी 
 माईला ममत्त्व वाटलो 


वेड्याला वेडा 
 शहाण्याला शहाणा
 गुन्हेगाराला गुन्हेगार 

 गुरुला गुरुवर्य वाटलो 


ज्याला जसा वाटलो 
त्याला तसा तसा वाटत राहिलो मी


...  राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा