मज होऊ दे _ कविता


 मज होऊ दे _ कविता 


मोगऱ्यात घुमुनी मज ,  मोगरा होऊ दे 
गुलाबात घुमुनी ,  मज गुलाब होऊ दे 
चाफ्यात घुमुनी , मज  चाफा  होऊ दे 
घुमता घुमता तेथेच , मज  वळण येऊ दे 


 मातीत झिजता ,  मज मातीच होऊ दे 
परकीयाचे  दुःख जाणुनी  , मज वेदना घेऊ दे 
संघर्षात लढुनी  , मज अमर होऊ दे 
 एका  युगाचा मज  ,  स्वुवर्ण  होऊ दे 


अश्रूच्या सागरात  , मज एकट्यास  राहू दे 
बुडत्यास सुखाचा  , एक किनारा देऊ दे 
नाव घेता वैरी याचे  , तव संकट टळू दे 
मदतीचा एक ,  मज हात होऊ दे 


 वेदनेचा  एकल मी  , उभा जळू दे 
त्या सर्वाच्या जीवनी  , आनंद वाटू दे 
मज डोळ्यांमध्ये ,  गंगा यमुना नाचू दे 
ओठावरती हास्य त्याच्या  , सतत रांगु  दे 


जिंकूनीया मी  सारे ,  त्याचेच  राहू दे 
मज शया  वरती पाहून ,  सारे शत्रू हसू दे 

राजेश मेकेवाड  

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi