बंड जीवनाचा - कविता

बंड जीवनाचा - कविता 

 दुःखाचा भात का
 शिजवतात काळजात  
 मुडदेच खाऊन जातात
 ठेवून जिवंत मुडद्यास .


कर्म करता जनाचे केले
 हात आमचे कर्मानेच धुले 
आयुष्य सारे कर्मात घातले 
कर्मानेच आमचे घात घेतले .


कष्टात आयुष्य आम्हीच वेचले
 जन्म घालूनी नव्या क्रांतीचे
 क्रांतीनेत सारे बदलून टाकले  
आमच्याच पदरात गोठे घातले .


आश्वासनात बांधून ठेवले 

सत्येच कुठे मावळून गेले 

त्यालाच आम्ही उगवित बसलो 
सत्यामुळेच वनवास भोगलो .


आमच्याच रक्ताच्या ज्योती लावूनी 
जळलो त्यांनाच प्रकाशात ठेवूनी 
उधळून टाकल्या साऱ्याच वाटा 
अंधार सारा  आमच्याच वाटी


- राजेश मेकेवाड

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi