अबोली जीवनाचे _ कवीता

अबोली जीवनाचे _ कवीता 


 अबोली शब्द तिचे 
कधी बोलकी होतील का 
हृदयाची धगधग 
कोणाच्या हृदयाला कळतील का 


 दुःख झरण्याचा अंत 
 सुख सागरासारखा होईल का 
कोणाच्या लेखनीने  
कुणाच्या अंतता सूर्यास्त होईल का 


न पाहिलेले रूप कुणाचे 
डोळ्यात तसे रंगतील का 
एका अंत हृदयाचा  
कुणाच्या स्पंदनी  फडकेल का   


सतत शीत प्रकाशाचा 
कुठे पेटून दीप उजळेल का 
अंधार स्वतः खाली ठेवूनी 
 कोणी दिव्यासारखे जळेल का 


 तिच्या जीवाची धावपळ 
कुणाच्या दारात संपेल का 
चिघळत्या जखमेवर कोणी 
वेळेस औषध देईल का 


 सतत चिंता मणी तिच्या 
कोणाच्या मनी  भेटेल का 
खळखळणाऱ्या वेदनेचा जीव 
कोण्या जीवनाच्या काठी थांबेल का 


रा.भा.मेकेवाड .

रा .भा .मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi