पाऊलवाटा _ कविता

पाऊलवाटा


अजुन काय हवे तूला  
जाता जाता सांग मला 
स्वप्नांचे झाले पाचोळे 
 तरिही  दरवळेन एकदा 


परतुन पाहण्यात माझ्या 
दिशा हिन झाल्या वाटा  
न सांगता हळूच गेला 
एवढा माझा काय गुन्हा 


वेदनेचा बाजार माझा 
रंगला भलताच वेगळा 
सरून जाव्या तश्याच माझ्या 
तुझ्या सोबती पाऊलवाटा 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड




 

Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi