चहुरलेली _ कविता

 चहुरलेली _ कविता  


झिरपून जावे देहावरती 
रात सारी का रेंगाळलेली 
अलगत पिऊन जावे 
वारा होऊन फुलावरती 


मधमाशीचा दंश नव्या 
पसरून जाते तन मन भारी 
मधुरता ती ओठावरची 
जीवनभर पूरवीत जाती 


सका सकाळी कुठे थवा   
पाखरांचा  निघून जातो 
रात घरट्यात जाणिवांची  
चिव चीवाट गोड होतो 


रोज  नव्याने पंख पसरते 
सैर झाल्या दाही 
चोची मध्ये चोच भरुनी 
चहुरलेली पिल्लासाठी आई 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi