तुझ शोधत आहे

 तुझ शोधत आहे  


उन्हाळलेल्या माळा वरती 
भास वलयतेचा शोधत आहे  
इथल्या कणाकणात  मी 
हरवलेले प्रेम  शोधत आहे 


वेलींचा झाडांचा फुलांचा 
इथल्या दगडांचा हुंदका शोधत आहे 
तुझा  दमलेला राघू 
त्याच्या मैनेला इथे शोधत आहे 


पानगळीचा ह्या मी 
तुझ हाती हिरवळ शोधत आहे 
या झाडावरती बहरलेला  
एक जिव्हाळा शोधत आहे  


चुकवलेल्या तु  पाऊल वाटी  
मी सदाबहार शोधत आहे 
करपलेल्या या जीवामध्ये 
नव पर्ण  तुझ शोधत आहे  


रोज नव्याने  मझ ह्रदयी 
लागणाऱ्या  झळा शोधत आहे  
एकांत दरवळलेला  
त्याचा  बहार शोधत आहे 
 


उन्मत्तलेल्या   उन्हाचा 
आक्रोश शोधत आहे  
तुझ्या आठवांची  लीला  
पापण्यात शोधत आहे 

तुझा राजेश मेकेवाड 



राजेश मेकेवाड





Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi