उन्हाळ कविता
उन्हाळ कविता
एक उन्हाळ उन्हाळ
पावसा विना माळरान
कुठे दडले माझ्या
मनाचे पाझर
प्रीत जागली तुफानी
खळखळ पापण्यात
या सागराची ओढ
उरी दाटली मनात
अंधारलेल्या दाही
कुठे शोधावा किरण
तुझ्या माझ्या प्रेमाचा
का वेगळाच डाव
कोणत्या मनाने मांडु
माझ्या पापण्याचा
जन्मोजन्मी मांडीला तु
माझ्या जीवाचा गाभार
पानगळ झाडाची या
का फुटावी बहार
तुझ्या विना कसे त्याचे
फुटतील पर्ण नव
सावरून आवरेना
हा फुटलेला टाहो
पापण्यात पावसाळ
किती आले बहरून
राजेश मेकेवाड
सारी का
Comments
Post a Comment