माझा पापण्यात सरी _ कविता

 माझा पापण्यात सरी _ कविता 


रुसतात वाटेवर 
पिवळे से पान 
जातात सोडूनी 
हृदयी घाव घालून 


हिरवळ झाडाची 
 आनंदी फुलाची 
सडा टाकुनिया 
मोजतात बिंब 


काळजाच्या पावली 
 गंधाच्या   रांगोळी 
वाटा पेटील्या  कुणी 
मला बांधूनी  या वरी   


एक  कीर्तीवंत 
तुझ्या प्रीती मध्ये  
खुलण्याचा  छंद
का वरी ढसले 


ज्या घरट्यात माझे स्वर्ग 
त्या ईश्वराला ठाव 
स्वप्नातल्या ह्या पाखराची 
तू कापी ले ग पंख 


भरलेल्या पापण्यासी 
अश्रू झाले गोड 
तरमळत्या डोळ्यामध्ये 
 हसरे तुझे ते रूप 


कधी सावल्याची ओढ 
मनी लागते झोप
सोडूनीया  आगेत   
माझ्या जागेला ओढ 


वाहते आठवणी 
किती प्रेमाळु   नदी  
वळणावळणात उभी 
माझ्या पापण्यात सरी 


भिजेल का या 
 राजा राणीची जोडी 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा