माझे डाव वेडेवाकडे _ कविता

माझे डाव वेडेवाकडे _ कविता 


अंतरून काळजाला तुझे रुसून चालणे 
माझे मलाच ठावे तुझीया  जीवाचे 
सोसतो मी जे न कळे ते कुणाला  
पसरून काळजाचे येणे जाणे झाले 


तुझ्या पायवाटा माझे काटेरी वागणे 
तुझीया दरवळ  माळ रान डोलनारे  
काट्याकुट्या दगड धोंड्याची  कोवळी 
मखमली जीवाची   झाली  पानगळे  


अडवाट जिवाची कळत खळ खळ
केकताळी जीवाला न  सारथी  कुणाचे 
माझे तुझे काय गाणे गायले  वेगळे 
कुणी मांडले हे माझे  डाव वेडेवाकडे  


चंदनाचे तू मनी साठल्या अत्तराचे 
मि मातीचे  सुगंध हुंदकावनारे   
बेभानलेली  सांज रेंगाळते तव 
जिवनी माझ्या धरा केशरी दिसते  


राजेश मेकेवाड

 
माझे  डाव वेडेवाकडे   _  कविता



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi