मि कातरीत होते - कविता

मि कातरीत होते - कविता

 पंख कोवळे कातरीत होते . 
चोंच पिवळी कातरीत होते. 
कधी कळ्यास कातरीत होते .
कधी फुलास कातरीत होते .


दुधाळ दात कातरीत होते . 
बोल बोबडे कातरीत होते .
 हुकले चुकले सारेच ते .
एक काळ कातरीत होते .


न कळत जगण्याचे सार ही . 
रक्ताचा एक उमटता डाग ही . 
जीवन माझे कातरीत होते . 
सारेच गंधर्वी कातरीत होते  .


दरवळणारा गंध सारा . 
चहुरल्या रक्तात दिशा  . 
सर्वच ते कातरीत  होते  .
 मी लपले तेथेही कातरीत होते .

  • राजेश मेकेवाड




राजेश मेकेवाड


राजेश मेकेवाड


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi